अभियंता हा झेडपीच्या प्रशासकीय यंत्रणेचा कणा

संभाजी लांगोरे || जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श अभियंता पुरस्कार वितरण
अभियंता हा झेडपीच्या प्रशासकीय यंत्रणेचा कणा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अभियंता हा जिल्हा परिषदेच्या सर्व प्रशासकीय यंत्रणेचा कणा आहे. सर्व विभागाच्या योजना या बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतात. सर्व विभागांच्या कामाची जबाबदारी अभियंत्यावर येते, अभियंत्यांची संख्या जिल्हा परिषदेत कमी जरी असली तरी सर्वजण जबाबदारीने काम करत आहेत, ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोेरे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श अभियंता पुरस्कार वितरण गुरूवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, कार्यकारी अभियंता रवींद्र परदेशी, सतीश कानिटकर पांडुरंग गायसमुद्रे, प्रवीण जोशी आदी उपस्थित होते.

करोना महामारीमुळे आदर्श अभियंता पुरस्काराचा कार्यक्रम झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी चार वर्षाचे पुरस्कार अभियंता दिनाचे औचित्य साधून वितरण करण्यात आले. यात 2018-19 साठी सीमा भोसले शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण, 2019-20 चा पुरस्कार गौतम भोसले, शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग जामखेड, 2020-21 चा पुरस्कार किरण साळवे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नगर आणि 21-22 चा पुरस्कार योगेश घारे शाखा अभियंता लघु पाटबंधारे उपविभाग अकोले यांना प्रदान करण्यात आला. अभियंता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याहस्ते करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी राऊत यांनी केले तर आभार किरण साळवे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com