झेडपीच्या आण्णासाहेब शिंदे सभागृहाची दुरवस्था

25 वर्षांच्या राजकारणाचा साक्षीदार; अनेक दिग्गज नेत्यांनी घेतल्या सर्वसाधारण सभा
झेडपीच्या आण्णासाहेब शिंदे सभागृहाची दुरवस्था

अहमदनगर |ज्ञानेश दुधाडे| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या वैभवशाली परंपरेचा साक्षीदार असणारे आणि तब्बल 25 वर्षे जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी सर्वसाधारण सभा चालवलेल्या जिल्हा परिषदेच्या आण्णासाहेब सभागृहाची मोठी दुरावस्था झाली आहे. सध्या या ठिकाणी मोडके साहित्य स्टोअर करून ठेवण्यात आले असून तुटलेल्या खिड्यातून या सभागृहात श्वानांचे वास्तव आहे. जिल्ह्यााच्या ग्रामीण भागाच्यादृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतलेल्या या सभागृहाच्या अवस्थेकडे सध्या सर्वाचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

झेडपीच्या आण्णासाहेब शिंदे सभागृहाची दुरवस्था
हॉटेलमध्ये काम करणारा तरुण आता 25 कोटींचा झाला मालक

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीशेजारी 1982 साली आण्णासाहेब शिंदे सभागृहाची निर्मिती करण्यात आली होती. त्याठिकाणी तेव्हापासून 2007 पर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व सर्वसाधारण सभा झालेल्या आहेत. या सभेत घडलेले प्रसंग, महत्वपूर्ण निर्णय आणि एका अविश्वास ठरावाचा हा सभागृह एकमेंव आणि अखेरचे साक्षीदार आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारत आणि त्यांच्या बांधकामासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाचा साक्षीदार असणार्‍या हा सभागृह काळाच्या ओघात सर्वांच्या दुर्लक्षीत झाला आहे. आता तर याठिकाणी कचरा, मोडलेले साहित्य यांची साठवणूक करण्यात आलेली आहे.

झेडपीच्या आण्णासाहेब शिंदे सभागृहाची दुरवस्था
पारनेर नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी १८ उमेदवारांचे अर्ज दाखल

यासह या ठिकाणी सभागृहात मागील बाजूने श्वानांचा मुक्त संचार आहे. 1982 पूर्वी जुन्या इमारतीमध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या जागेत जिल्हा परिषदेचे आधीचे सभागृह होते. मात्र, त्याठिकाणी जागा अपूरी पडू लागल्याने नव्याने इमारत बांधून 1982-83 पासून त्याठिकाणी आण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने सभागृह सुरू करण्यात आल्याची माहिती सेवानिवृत्त जुने जाणते कर्मचारी सांगतात. याच सभागृहात तत्कालीन अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या काळात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार सिंघल यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारीत झाला होता.

तर आणखी एका मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात अविश्वासाची तयारी करण्यात आली होती. मात्र, तो थोपविण्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यशस्वी ठरले होते. शिंदे सभागृहात तासंतास जिल्हाच्या विकासावर चर्चा झाल्याचे नगरकरांनी पाहिलेले आहे. अशा जिल्हा परिषदेच्या वैभवशाली परंपरेचा साक्षीदार असणार्‍या शिंदे सभागृह आणि त्याच्या दुरावस्थेकडे विद्यामान स्थितीत कोणाचे लक्ष दिसत नाही.

शिंदे सभागृहातून कामकाज केलेले अध्यक्ष

यशवंतराव गडाख, आप्पासाहेब राजळे, ज्ञानेदव कासार, बाबासाहेब पवार, एस.जे. कुंटे (प्रशासक), अरूण कडू, विमल ढेरे, अशोक भांगरे, नरेंद्र पाटील घुले, बाबासाहेब भोस, मिस्टर शेलार आणि बाबासाहेब भिटे यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचा विकास करण्यासाठी पुण्यातील पुरात्व विभागाशी संबंधीतांना काम सोपविण्यात आले आहे. जुन्या इमारतीच्या बांधकामाचा अंदाज घेवून राज्य सरकार पातळीवरून नाविण्यपूर्ण योजनेतून निधी मिळवून झेडपीच्या इमारतीचा ऐतिहासिक वास्तू म्हणून सुशोभिकरण करण्याचा प्रयत्न आहे.

- डॉ. राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com