आण्णासाहेब शिंदे सभागृहाच्या दुरावस्थेवर माजी अध्यक्षांची नाराजी

किमान स्वच्छता राखण्याची व्यक्त केली अपेक्षा
आण्णासाहेब शिंदे सभागृहाच्या दुरावस्थेवर माजी अध्यक्षांची नाराजी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्हा परिषदेच्या वैभवशाली परंपरेचा साक्षीदार असणार्‍या जिल्हा परिषदेच्या आण्णासाहे शिंदे सभागृहाची झालेल्या दुरावस्थेवर माजी अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत किमान या सभागृहाची स्वच्छता राखावी, हे सभागृह त्या काळातील जिल्हा परिषदेच्या अनेक घटना, निर्णयाचे साक्षीदार आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होवू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आण्णासाहेब शिंदे सभागृहाच्या दुरावस्थेवर माजी अध्यक्षांची नाराजी
झेडपीच्या आण्णासाहेब शिंदे सभागृहाची दुरवस्था

दै. सार्वमतने जिल्हा परिषदेच्या आण्णासाहेब शिंदे सभागृहाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधल होते. याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच जिल्हा परिषदेच्या अनेक जुन्या-जाणत्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचर्‍यांनी यांच्यासह माजी अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. 1982-83 ते 2007 या कालावधीत या ठिकाणी 11 अध्यक्षांनी सर्वसाधारण सभा चालविलेल्या आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या प्रश्नांवर त्याठिकाणी चर्चा होवून सर्वसमावेश धोरणात्मक निर्णय झालेले आहे. विकास कामांच्या प्रश्नांवर तत्कालीन सदस्यांनी कधी पदाधिकारी तर कधी प्रशासनाला तर पदाधिकार्‍यांना धारेवर धरलेले जिल्ह्याने पाहिलेले आहे. या सभागृहाला आण्णासाहेब शिंदे यांच्या सारख्या मोठ्या व्यक्तीचे नाव दिलेले आहे. यामुळे त्याकडे दुलर्क्ष होवू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या आण्णासाहेब शिंदे सभागृहाची अलिकडच्या काळातील परिस्थिती मी पाहिलेली नाही. एखादी वस्तू वापरत नसल्यास असे प्रकार होवू शकतात. मात्र, असे असले तरी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग आणि बांधकाम विभागाने त्याची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

- अरूण कडू, माजी अध्यक्ष, जि.प.

गेली 15 वर्षे माझा जिल्हा परिषदेशी संपर्क राहिलेला नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्या आण्णासाहेब शिंदे सभागृहाला मोठी परंपरा आहे. मोठ्या व्यक्तीचे नाव या सभागृहा देण्यात आलेले असल्याने त्याची निगा ही राखली गेली पाहिजे. जिल्हा परिषदेने शिंदे सभागृहाची काळजी घ्यावी.

- बाबासाहेब भोस, माजी अध्यक्ष, जि.प.

जिल्हा परिषदेच्या जुन्या शिंदे सभागृहाला मोठी परपंरा आहे.शिंदे यांचे देशपातळीवरील नाव झेडपीच्या तत्कालीन सभागृहाला देण्यात आलेले आहे. माझ्या कार्यकाळातील शेवटची सभा याच सभागृहात झालेली आहे. आता त्याच्या स्वच्छतेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपक्षा आहे.

- बाबासाहेब भिटे, माजी अध्यक्ष, जि.प.

गौरवशाली परंपरा असलेल्या नगर जिल्हा परिषदेने अनेक नामवंत नेतृत्व तयार केलेले आहेत. ज्या सभागृहात नामवंत नेतृत्व उदयास आले तेच सभागृह अडगळीत पडले असले तर उपयोग काय? नवीन इमारत मिळाल्यानंतर जुन्या वास्तूकडे दुर्लक्ष कराचे का? शंकरराव काळे, पद्मश्री खा. बाळासाहेब विखे पाटील, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख असे अनेक नामवंत नेतृत्व या जिल्हा परिषदेने देशापातळीवर पाठवल्याचा विसर पडता कामा नये, अशी अपेक्षा.

- राजेश परजणे, ज्येष्ठ सदस्य, जि.प.

Related Stories

No stories found.