प्रशासकीय मान्यतेच्या कचाट्यात अडकल्या विकास कामांच्या फाईल्स

जिल्हा परिषद : ऐन निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकार्‍यांवर आली हात धरून बसण्याची वेळ
प्रशासकीय मान्यतेच्या कचाट्यात 
अडकल्या विकास कामांच्या फाईल्स
जिल्हा परिषद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लाल फितीचा कारभाराचा अनुभव सध्या जिल्हा परिषदेचे पदाधिकारी घेतांना दिसत आहेत. सत्तेत असतांनाही या पदाधिकार्‍यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून राहण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या कचाट्यात विकास कामांच्या फाईल्स अडकल्याची कुजबुज सध्या जिल्हा परिषदेच्या वर्तुळातून कानावर येत आहेत.

आधीच करोनामुळे वाया गेलेला कालावधी, त्यात पहिल्यांदा मिळालेला शंभर टक्के निधी यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या होता. निदान जाता जाता भरीव विकास कामे मतदारसंघात नेता येतील, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, या आशा आणि अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता आता निर्माण झाली असल्याची चर्चा आता जिल्हा परिषदेतून कानावर येत आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद प्रशासन विरोधात पदाधिकारी यांच्या संघर्ष झालाच तर आर्श्चय वाटायला नको.

प्राप्त माहितीनूसार जिल्हा परिषदेमधील जनसुविधा, नागरी सुविधा, 15 वा वित्त आयोग आराखडा, 15 वा वित्त आयोग व्याजातून होणारी कामे आणि ग्रामपंचायत सेस फंडातील कामांच्या फाईल या प्रशासकीय पातळीवर पडून आहेत. त्या फाईल योग्य अथवा अयोग असा कोणताच निर्णय होत नसल्याने पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. महिनाभरात निवडणूक आचारसंहिता लागणार आहे. जिल्हा नियोजन समितीने यंदा 100 निधी दिला आहे. ऐवढा निधी कसा खर्च करणार असा प्रश्न पदाधिकार्‍यांना भेडसावत आहे. यामुळे विद्यामान पदाधिकारी आणि प्रशासन यांच्या जाताजाता संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता सुत्रांनी दिली.

आधीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेला आधी दिलेल्या निधी खर्च करण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा निधी अखर्चित राहिल्यास याला जबाबदार कोण असा सवाल सदस्य विचारत आहेत. त्यात आता पुन्हा विकास कामांचा फाईल्सचा प्रवास थांबल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com