झगडे फाट्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

गुन्हे शाखेची कारवाई, धारदार हत्यारासह गावठी कट्टा हस्तगत
झगडे फाट्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथे सिन्नरकडे जाणार्‍या रोड लगत खडकी नाल्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, एक तलवार, एक लोखंडी कत्ती, लोखंडी कटावणी, एक सूरी, लाकडी दांडके, बॅटरी, मोबाईल असा एकूण 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

झगडे फाटा येथे सिन्नरकडे जाणारे रोडलगत खडकी नाल्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अंधारात दबा धरून वाहने येण्याची वाट पहात असताना दिसली. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून जेरबंद केले.

अशोक कागद चव्हाण, रा. हिंगणी, ता. कोपरगांव, भाऊसाहेब कागद चव्हाण, रा. हिंगणी, ता. कोपरगांव, परमेश्वर बाबासाहेब काळे, तुर्काबाद खराडी, राजुरा, ता . गंगापूर, औरंगाबाद, जिभाऊ गजानन काळे रा . गुट्टे वडगांव, औरंगाबाद, देवगन कागद चव्हाण रा. हिंगणी, बाबूल कागद चव्हाण रा . हिंगणी, कागद मारुती चव्हाण, बेबो कागद चव्हाण, मिजेश निजाम काळे,औरंगाबाद या आरोपींना जेरबंद केले.

त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, एक तलवार, एक लोखंडी कत्ती, लोखंडी कटावणी, एक सुरी, लाकडी दांडके, बॅटरी, मोबाईल असा एकूण 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदरचे इसम हे दरोड्याची तयारी करुन कोठेतरी दरोडा घालण्यासाठी एकत्र आलेले असल्याची खात्री झाल्याने पो.कॉ. संदीप विनायक चव्हाण स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी कोपरगांव तालुका पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

वरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द यापुर्वी दरोडा, जबरी चोरी, स्वस्तात सोने देण्याचे अमिष देऊन लुटमार करणे, मारामारी या सारखे गंभीर स्वरुपाचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईत सपोनि मिथुन घुगे, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, पोना सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, संतोष लोढे, दिनेश मोरे, विशाल दळवी, रवि सोनटक्के, पोकॉ मच्छिन्द्र बर्डे, संदीप चव्हाण, जालिंदर माने, प्रकाश वाघ, सागर सुलाने, आकाश काळे, चालक पोहेका उमाकांत गावडे तसेच पोना असीर सय्यद, अशोक शिंदे आदींचा सहभाग होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com