झगडे फाटा येथे अपघातात दोन गंभीर जखमी

झगडे फाटा येथे अपघातात दोन गंभीर जखमी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील झगडे फाटा (Zagade Phata) येथे दोन वेगवेगळ्या अपघातात (Accident) एक महिला व एक पुरुष गंभीररित्या जखमी (Injured) झाल्याची घटना घडली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 160 वर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 व राज्य मार्ग झगडे फाटा (Zagade Phata) ते संगमनेर (Sangamner) व झगडे फाटा (Zagade Phata) ते पुणतांबा फाटा (Puntamba Phata) राष्ट्रीय महामार्ग असे तीन रस्ते झगडे फाटा या ठिकाणी एकत्र येतात. राष्ट्रीय महामार्ग क्र 160 चे संपूर्ण काम अजून झालेले नाही. परंतु झगडे फाटा परिसरात रस्त्याचे बर्‍यापैकी काम झालेले असल्यामुळे चार, चाकी वाहने अति वेगाने ये-जा करत असतात. त्यामुळे या परिसरामध्ये आतापर्यंत अनेक अपघात (Accident) घडलेली आहेत.

झगडे फाटा येथे अपघातात दोन गंभीर जखमी
पाच वर्षापासून पसार असलेला सराईत अटकेत

ज्ञानेश्वर पुंडलिक झावरे, रा. पोहेगाव हे कोपरगाव येथील आपले काम आटोपून पोहेगावकडे एक्टिवा क्र. एमएच 17 एयू 5600 वर घरी परतत असताना झगडे फाटा येथे संध्याकाळी 7.45 वाजता शिर्डीकडून (Shirdi) नाशिककडे (Nashik) जाणार्‍या ट्रॅव्हल्सने त्यांच्या एक्टिवा गाडीला धडक दिल्यामुळे ते गंभीररित्या जखमी (Injured) झाले. परंतु ट्रॅव्हल्स चालक धडक देऊन निघून गेला. तेथील नागरिकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

झगडे फाटा येथे रविवारी दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान गवारे नामक इसम आपले बजाज प्लॅटीना मोटरसायकल क्र. एमएच 17 सीजी 0251 वर एक महिला घेऊन कोपरगावकडून पोहेगावच्या दिशेने जाताना नाशिककडून (Nashik) शिर्डीकडे (Shirdi) जाणार्‍या इनोव्हा कार क्र. डीएन 09 जी 2610 या गाडीने धडक दिल्यामुळे मोटरसायकलवरील महिला गंभीर जखमी झाली आहे. तेथील नागरिकांनी त्या दोघांनाही पुढील उपचारासाठी कोपरगावला त्याच कारमधून रवाना केले.

झगडे फाटा येथे अपघातात दोन गंभीर जखमी
‘तेल्या’च्या प्रादुर्भावामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत

झगडे फाटा या ठिकाणी भरधाव वेगाने जाणार्‍या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजना होणे गरजेचे असल्याची चर्चा येथील नागरिकांमधून होत आहे. तसेच कोपरगाव संगमनेर मार्गावर (Kopargav-Sangamner Highway) होणार्‍या उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे ते काम लवकर पूर्ण झाले तर अपघाताला (Accident) बर्‍याच प्रमाणात आळा बसू शकेल व त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी जेणेकरून अपघात करून जाणार्‍या वाहनांची माहिती त्यातून पोलिसांना मिळून जखमींना न्याय देण्यासाठी याचा फायदा होऊ शकेल, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

झगडे फाटा येथे अपघातात दोन गंभीर जखमी
राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com