मुंबईच्या यूथ मिशनतर्फे जिल्ह्यासाठी एक ट्रक औषधे

आ. संंग्राम जगताप : मिशनकडून करोना काळात माणुसकीचे दर्शन
मुंबईच्या यूथ मिशनतर्फे जिल्ह्यासाठी एक ट्रक औषधे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना (Corona) संकट काळात प्रत्येकाने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. नगर जिल्ह्यावर (Ahmednagar District) करोनाचे महाभयंकर संकट ओढवले होते. यामध्ये काही रुग्णांचा मृत्यू झाला. या संकट काळात नागरिक भयभीत झाले होते. त्यांना आधार देणे गरजेचे आहे. करोनामध्ये नागरिकांची आर्थिक, मानसिक व आरोग्याची (Health) मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यामुळे मुबंई येथील युथ विथ मिशन यांनी मानवी भावनेतून नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात औषधाचा पुरवठा ( Supply of medicine)उपलब्ध करून दिलाश. त्यांनी मानवाचे कर्तव्य पार पाडून समजासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन, आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी केले.

बूथ हॉस्पिटल (Booth Hospital) येथे मुबंई येथील युथ विथ मिशनच्या (Youth with Mission) वतीने जिल्ह्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या औषधांचा साठा (Supply of medicine) उपलब्ध करून देण्यात आला. आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते तो बुथ हॉस्पिटल येथे उतरवून घेण्यात आला. यावेळी डॉ. मारी मुथु, बबन कंबळे, बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, जॉन्सन बेनेझर, जिल्हा समन्वयक रॉबर्ट शेलार, पहिली मंडळी चर्चे खजिनदार शामवेल खरात, अनिल लष्करे आदी उपस्थित होते.

डॉ. मारी मुथु म्हणले की, जिल्ह्यामध्ये करोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढली होते, यात काहींचा मृत्यू झाला. तज्ञांच्या मते तिसर्‍या लाटेचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामध्ये लहान मुले बाधित होणार असल्याचे मत व्यक्त केलेले. तिसरी लाट परतवून लावण्यासाठी मुंबई येथील युथ विथ मिशने पुढाकार घेऊन जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या (ZP) आरोग्य केंद्रांवर (Health Center) व जिल्ह्यातील 13 तालुकास्तरावर जाऊन औषधांचे वाटप (Distribution of medicines) करण्यात येणार आहे. याच बरोबर करोना संदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती केली जणार आहे. यामध्ये नागरिकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विटामिनचे औषधे व वाफेचे मशीन तसेच लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com