तरुणाने पत्नीसमोरच केले विष प्राशन
सार्वमत

तरुणाने पत्नीसमोरच केले विष प्राशन

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील घटना

Arvind Arkhade

टिळकनगर|वार्ताहर|Tilaknagar

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे (आठवाडी) येथील एका विवाहित तरुणाने आपल्या राहत्या घरी स्वतःच्या पत्नी समोरच कीटकनाशक औषध पिऊन विष प्राशन केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली.

सदर तरुणाला तात्काळ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सदर तरणाने विष प्राशन का केले याचे कारण समजू शकले नाही. तो एकलहरे गावचा जावई आहे.

Deshdoot
www.deshdoot.com