युवकावर तलवारीने जीवघेणा हल्ला करणारे तिघे अटकेत

तोफखाना पोलिसांत गुन्हा : नगरमधील घटना
युवकावर तलवारीने जीवघेणा हल्ला करणारे तिघे अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

युवकावर तलवार, कोयता, चॉपर व लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. शेहबाज ऊर्फ बाबा शौकत शेख (वय 40), अल्तमाश ऊर्फ अल्लु शौकत शेख (वय 32) व इम्तियाज मेहब्बुअलि शेख (वय 41, तिघे रा. शनिगल्ली, झेंडीगेट) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

6 जून रोजी हाशिर एजाज शेख (वय 23 रा. शनिगल्ली, झेंडीगेट, अहमदनगर) या युवकाला 11 ते 12 जणांनी मारहाण करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जाबाबावरून 11 ते 12 जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कराचीनगर जाणार्‍या रोडवरील हुंडेकरी पार्किंगजवळ ही घटना घडली होती.

हाशिर व त्याचे चुलते मारूफ रियाज शेख (रा. पंचपीर चावडी, अहमदनगर) यांच्यामध्ये सुमारे तीन वर्षांपासून घराचे जागेवरून वाद आहेत. 3 जून रोजी हाशिर यांच्या वडिलांचा व मारूफ यांचा एका वलिमा कार्यक्रमात वाद झाला होता. 6 जून रोजी रात्री साडेदहा वाजता हाशिर याला 11 ते 12 जणांनी कराचीनगर रोडवर हुंडेकरी पार्किंगजवळ तलवार, कोयता, चॉपर, लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विश्वास भान्सी, उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. या गुन्ह्यातील इतर आरोपी पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com