नगर तालुक्यातील 22 वर्षीय तरूणाची आत्महत्या

नगर तालुक्यातील 22 वर्षीय तरूणाची आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

22 वर्षीय तरुणाने (Youth) राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार (Sarola Kasar) येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. संकेत बाळासाहेब काळे (वय 22, रा.खडकी रोड, सारोळा कासार) असे या मयत तरुणाचे नाव आहे.

आई-वडील व घरातील इतर कुटुंबिय शेतात कामासाठी गेलेले असताना सायंकाळी 5 च्या सुमारास त्याने घरातील छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घराबाहेर बसलेल्या त्याच्या वृद्धा आजीच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तिने आरडाओरडा करुन शेजार्‍यांना बोलविले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू (death) झालेला होता.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप बोडखे, शिपाई राजेंद्र ससाणे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गावातील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com