
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील जांबुत खुर्द शिवारात एका पाच दिवसापूर्वी विवाह झालेल्या 23 वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली. अरुण बाळू पारधी (वय 23, रा. जांबुत खुर्द, ता. संगमनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पाच दिवसापूर्वी त्याचा पिंपळदरी येथे विवाह पार पडला होता. अंगावरील हळद फिटली नाही तेच या तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत पोलीस पाटील संदीप खंडु भुरके यांनी घारगाव पोलिसांना खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.