विवाहित तरूणाची सासुरवाडीत गळफास घेऊन आत्महत्या

File Photo
File Photo

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) उंबरे (Umbare) येथे एका 35 वर्षीय विवाहित तरूणाने (Youth) काल पहाटेच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संभाजी दशरथ थोरात वय 35 वर्षे हा तरूण नेवासा तालुक्यातील (Newasa) माळद पिंपळगाव (Malad Pimpalgav) येथील रहिवाशी असून काही महिन्यांपासून तो उंबरे (Umbare) येथे सासुरवाडीत राहत होता. आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी त्याने पहाटेच्या दरम्यान उंबरे (Umbare) येथील त्याच्या सासूरवाडीच्या राहत्या घरात छताला असलेल्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास (Suicide) घेतला.

सकाळी घरातील इतर लोक उठल्यावर त्यांना संभाजी थोरात हा गळफास (Suicide) घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. संभाजी थोरात याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई वडील असा परिवार आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com