नांदूर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नांदूर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राहाता तालुक्यातील नांदूर येथील एक़ा 25 वर्षीय तरुणाने आपल्या पोटाच्या विकाराला कंटाळून घराजळच असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नांदूर येथील ज्ञानेश्वर बाबासाहेब गोरे (वय 25) हा तरुण नांदूर येथील गोरे वस्तीवर राहायला होता. तो बीएससीची पदवी शिक्षण घेत होता. त्याला बर्‍याच दिवसांपासून पोटाचा आजार होता. या आजाराला वैतागलेल्या ज्ञानेश्वरने काल घराजवळच असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारापूर्वीच तो मयत असल्याचे साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात साखर कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानुसार शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com