तरुणाची शौचालयात आत्महत्या

तरुणाची शौचालयात आत्महत्या

घारगाव | Ghargav

तेवीस वर्षीय तरुणाने शौचालयात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी गावाअंतर्गत असणार्या लहुचामळा येथे सोमवारी (दि. 6 जून) रात्रीच्या सुमारास घडली. किरण दिलीप मंडलिक असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरण मंडलिक हा तरूण त्याच्या आईवडिलांसोबत लहूचामळा येथे राहत होता. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवन झाल्यानंतर मंडलिक कुटुंब झोपले होते. घरातील सदस्य सोमवारी सकाळी उठल्यानंतर शौचालयास गेले असता किरणने लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली.

घटनेची माहिती समजताच पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू खेडकर, नामदेव बिरे आदिंनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी गणपत विठ्ठल मंडलीक यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान किरणने आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com