तरूणाची आत्महत्या; सात जणांविरोधात गुन्हा

बहिणीची एमआयडीसी पोलीसात फिर्याद
तरूणाची आत्महत्या; सात जणांविरोधात गुन्हा
Crime

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रतीक बाळासाहेब काळे (वय 27) या वर्षीय तरुणाने शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील हॉटेल सुवर्णज्योत जवळील वांबोरी फाट्यानजीक शेतामध्ये लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी प्रतिकची बहीण प्रतीक्षा काळे हिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रतिक नोकरीस असलेल्या एका बड्या संस्थेशी निगडित सात जणांविरोधात प्रतिकला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सातजणांविरोधात भादवी 306 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महेश गोरक्षनाथ कदम, विनायक दामोदर देशमुख, राहुल जनार्दन राजळे, व्यंकटेश नामदेव बेल्हेकर, जगन्नाथ कल्याण औटी, रावसाहेब भीमराव शेळके आणि रितेश बबन टेमक यांची नावे असून हे सर्व संबंधीत एका मोठ्या संस्थेशी निगडित असल्याचे फिर्यादीत नमुद केलेले आहे. हे सर्वजण माझा भाऊ प्रतिकला गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक त्रास देत होते. प्रतिकच्या प्रामाणिकपणा मुळे तो गडाख कुटुंबाच्या जवळ गेला होता. यामुळे या सात जणांनी प्रतिकला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याला तू नोकरी सोड, महाराष्ट्रात राहू नको असे सांगण्यात आले होते. त्याची खानावळ बंद पाडण्यात आली,

अ‍ॅडव्हान्स कमी करण्यात आला होता. तसेच बळजबरीने राजीनामा घेण्यात आला पण तो मंजूर केला नाही. हा सर्व अन्याय आणि त्रास प्रतिक घरी नेहमी सांगत होता. अखेर त्रास असह्य झाल्याने त्याने आत्महत्या केली असून यास जबाबदार असणार्‍या सातही जणांना अटक करून प्रतिकला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी बहीण प्रतीक्षा काळे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com