
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
फोनवरून धमकावून व मानसिक त्रास दिल्याने तरूणाने राहत्या घरात गळफास (Youth Suicide) घेऊन आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. दिनेश कांबळे (रा. सिव्हील हडको) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या तरूणाचे नाव आहे.
याप्रकरणी मयत तरूणाचा भाऊ गणेश कांबळे (वय 27, रा. मुंगुसवाडी, ता. पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात (Topkhana Police Station) वैष्णवी शिलवाने, वैष्णवी शिलवाने हिची बहिण (नाव माहित नाही), वैष्णवी शिलवाने हिचे दाजी (नाव माहित नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे, 8 ऑक्टोबर रात्री 9 ते 9 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वासहाच्या दरम्यान दिनेश याने सिव्हिल हाडको येथील तो राहत असलेल्या भाड्याच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
दिनेशला वैष्णवी शिलवाने, वैष्णवी शिलवाने हिची बहिण (नाव माहित नाही), वैष्णवी शिलवाने हिचे दाजी (नाव माहित नाही) यांनी मानसिक त्रास देऊन फोनवरून धमकावून वारंवार त्रास देऊन आत्महत्या (Suicide) करण्यास प्रवृत्त केले. पुढील तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.