गळफास घेत युवकाची आत्महत्या

गळफास घेत युवकाची आत्महत्या

पाचेगाव | वार्ताहर | Pachegoan

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे एका युवकाने घरासमोरील झाडाला गळफास घेऊन...

आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२४) सकाळी उघडकीस आली.

कचरू रामभाऊ गवळी (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सदर युवक पाचेगाव ते पाचेगाव फाटा या रस्त्याच्या कडेला गेली पाच वर्षांपासून शेतात वस्ती करुन राहत होता.

बुधवारी (दि.२४) पहाटे पाच वाजेच्या सुमारास घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण नेमके समजले नाही.

आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या अहवालावरून नेवासा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. घटनेचा पुढील तपास पो.नाईक ज्ञानेश देवकाते हे करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com