पैशासाठी छळले; युवकाने जीवन संपविले

महिलेसह तिघांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
पैशासाठी छळले; युवकाने जीवन संपविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पैशासाठी छळ केल्याने युवकाने स्लॅबच्या हुकला साडीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दिनांक 14 मे) गजराजनगरमध्ये (बुर्‍हाणनगर ता. नगर) घडली. अजय बाळासाहेब कुर्‍हाडे (वय 23 रा. शंकर सोसायटी, गजराजनगर, बुर्‍हानगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत अजय कुर्‍हाडे याचे मामा अशोक वसंत शिंदे (वय 45 रा. शंकर सोसायटी, गजराजनगर, बुर्‍हानगर) यांनी फिर्याद दिली आहे. काजल राजु गायकवाड, आकाश सुभाष कुर्‍हाडे, गजानन शाम पवार (तिघे रा. गजराजनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. काजल राजु गायकवाड हिने अजय कुर्‍हाडे याला पैशासाठी वेळोवेळी त्रास देऊन त्याचा मानसिक छळ केला. 14 मे रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास,‘तु मला 50 हजार रूपये आणून दे’, अशी अजयला धमकी देवून शिवीगाळ करून काजल राजु गायकवाड तसेच आकाश सुभाष कुर्‍हाडे, गजानन शाम पवार यांनी संगनमत करून अजय बाळासाहेब कुर्‍हाडे याचा पैशासाठी छळ करून त्यास विठ्ठल रेसिडेन्सीं अपार्टमेंट (गजराजनगर, बुर्‍हाणनगर) येथील किचन रूममधील स्लॅबच्या हुकला साडीने गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे, असे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com