युवकाने आधी विषारी औषधाचे सेवन केले अन् नंतर घेतला गळफास

कुठे घडली घटना
युवकाने आधी विषारी औषधाचे सेवन केले अन् नंतर घेतला गळफास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राहत्या घरात विषारी औषधाचे सेवन करून गळफास घेत युवकाने आत्महत्या केली. राहुल राजाराम भाडमुखे (वय 22, हल्ली रा. कांबळे मळा, केडगाव, मुळ रा. वाडीव-हे, दहिगाव रोड, ता. इगतपुरी, जि. नाशिक) असे मयत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहुल भाडमुखे हा कांबळे मळ्यातील गणेश भाऊराव काळजे यांच्या घरामध्ये भाडोत्री राहत होता. त्याने तेथेच विषारी औषधाचे सेवन करून गळफास घेतला. त्याला दुपारी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान राहुलने आत्महत्या का केली याबाबत माहिती समजू शकली नाही. कोतवाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com