गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

बालिकाश्रम येथील घटना
गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. रामदास रभाजी मुखेकर (वय 30 मूळ रा. कोरडगाव, ता. पाथर्डी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

येथील बालिकाश्रम रस्त्यावरील बोरूडे मळा येथे शनिवारी (दि. 20) रात्री 10 वाजता ही घटना घडली. रामदास रभाजी मुखेकर हे बालिकाश्रम रस्त्यावरील बोरूडे मळा येथे आकांत लक्ष्मीकांत बोरूडे यांच्या घरामध्ये भाड्याने राहत होते. रामदास मुखेकर यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

घरमालक आकांत बोरूडे यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे यांनी तपासणी केली असता ते उपचारापूर्वीच मदत झालेले होते. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक संतोष गर्जे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com