
राहाता |वार्ताहर| Rahata
शहरात मकरसंक्रांत (Makar Sankrant) निमित्त तरुण-तरुणींनी पतंग (Kite) उडवण्याचा आनंद घेऊन ढोल-ताशा संगीताच्या मधूर सुरात ठेका धरत दिलखुलासपणे मकर संक्रांतीचा (Makar Sankrant) आनंद घेतला.
मकर संक्रांत (Makar Sankrant)) म्हटली की, तरुणांच्या डोळ्यासमोर पतंग उडवण्याची संकल्पना येते. एकेकाळी मकर संक्रांतीला येवला तालुका (Yeola Taluka) पतंग उडवण्यासाठी प्रसिद्ध समजला जात होता. परंतु गेल्या 4 ते 5 वर्षांपासून राहाता शहरात (Rahata City) मकर संक्रांतीच्या दिवशी संपूर्ण शहरात मोठमोठ्या बिल्डिंगच्या छतावर तरुणाई ढोल-ताशा व मधुर संगीताच्या तालावर ठेका धरत पतंग (Kite) उडवण्याचा आनंद घेताना दिसतात. राहाता शहरात शुक्रवारी सकाळपासूनच पतंग, आसरी व दोरा खरेदी करण्यासाठी तरुणांनी दुकानात गर्दी केली होती. सध्या चिनी व इतर मांजावर राज्य सरकारने बंदी घातली असतानाही राहाता शहरात अनेक ठिकाणी सर्रासपणे मांजाची विक्री केली जात होती.
चिनी मांजाची विक्री करणार्या व्यावसायिकांकडे पोलीस सर्रासपणे कानाडोळा करताना दिसत होते. चिनी मांजामुळे पक्ष्यांना तसेच सायकल व दुचाकीस्वारांना रस्त्यावरून जाताना दुखापत होते असे अनेक उदाहरण घडत असताना राहाता पोलिसांनी शहरात विक्री होणार्या चिनी मांजावर कुठल्याही प्रकारे अंकुश ठेवताना दिसले नाही.
शहरात दिवसभरात लाखो रुपयाच्या पतंग व चिनी मांजाची विक्री झाल्याची माहिती अनेक पतंग विक्रेते व चिनी मांजा विक्रेते यांनी दिली. राहाता शहरात लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत पतंग उडवायचा आनंद नागरिक घेताना दिसत होते. मकर संक्रांतीच्या दिवशी घरी केलेल्या पुरणपोळीचा आस्वाद घेऊन अनेकांनी आपल्या घराच्या छतावर पतंग उडवण्याचा आनंद घेतला. वयोवृद्ध नागरिकांना ही पतंग उडवण्याचा मोह आवरला नाही. एकमेकाच्या पतंगीचा दोरा कापण्याची स्पर्धा रंगात आली होती. तर काही बालकांनी कापलेला पतंग धरून ठेवण्यासाठी स्पर्धा करताना दिसले. शहरात दिवसभर मधून संगीत व ढोल ताशा व फटाक्यांची आतिषबाजी करत मकर संक्रांतीचा आनंद घेताना दिसले.