जुन्या वादातून युवकावर खुनी हल्ला

तोफखाना पोलिसांत 11 जणांविरूध्द गुन्हा
जुन्या वादातून युवकावर खुनी हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

11 ते 12 जणांच्या टोळक्याने युवकावर तलवार, कोयता, चॉपर व लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हाशिर एजाज शेख (वय 23 रा. शनिगल्ली, झेंडीगेट, अहमदनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान त्याने पोलिसांना दिलेल्या जाबाबावरून 11 ते 12 जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारूफ रियाज शेख (रा. पंचपीर चावडी, अहमदनगर), शहेबाज शौकत कुरेशी, अल्तमाझ ऊर्फ अल्लु शौकत कुरेशी, मिजान बरकत कुरेशी, इम्तीयाज कुरेशी, आनीस बाबा (सर्व रा. शनि गल्ली, झेंडीगेट), काझीम शेख, बब्बु (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. ईदगाह मैदान, अहमदनगर) व इतर तीन ते चार अनोळखी यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजता कराचीनगर जाणार्‍या रोडवरील हुंडेकरी पार्किंगजवळ ही घटना घडली.

हाशिर व त्यांचे चुलते मारूफ यांच्यामध्ये सुमारे तीन वर्षांपासून घराचे जागेवरून वाद आहेत. 3 जून रोजी हाशिर यांच्या वडिलांचा व मारूफ यांचा एका वलिमा कार्यक्रमात वाद झाला होता. सोमवार (दि. 6) रात्री साडेदहा वाजता हाशिर रामवाडी, सर्जेपुरा येथील कृष्णा अपार्टमेंट येथे पुलटेबल गेम खेळत असताना 11 ते 12 जण तेथे आले व ते हाशिर याला म्हणाले,‘वलिमा कार्यक्रमात जो वाद झाला आहे तो आपण आपसात मिटून टाकू, तू माझ्यासोबत गाडीवर चल’, असे म्हणाल्याने हाशिर याला त्यांनी कराचीनगर रोडवर हुंडेकरी पार्किंगजवळ घेऊन गेले. तेथे असलेल्या 10 ते 11 जणांनी मारूफच्या सांगण्यावरून हाशिरला तलवार, कोयता, चॉपर, लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com