तरुणावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

तरुणावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

लोणी |वार्ताहर| Loni

लोणी येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) सादतपूर (Sadatpur) गावात रविवार दि.17 रोजी रात्रौ 8 वाजण्याच्या सुमारास तरुणावर बिबट्याने जीववघेणा हल्ला (Youth Leopard Attack) केला. त्यात हा तरुण जखमी (Youth Injured) झाला.

अक्षय किसन काळे हा काळे वस्तीवर राहणार तरुण संध्याकाळी आपले दिवसभराचे काम आटोपून घराकडे जात होता. त्याचवेळी बिबट्याची (Leopard) मादी व तिचे दोन बछडे रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेले होते. अक्षय त्यांच्या जवळ येताच बिबट्याने (Leopard) त्याच्यावर झडप घातली. अक्षयने मात्र धीराने प्रतिकार करून बिबट्याला काढतापाय घेण्यास भाग पाडले. यामध्ये अक्षयच्या छातीवर (Chest), पोटावर (Stomach) आणि हातावर बिबट्याच्या दाताने जखमा (Injured) झाल्या. वर्षातील ही तिसरी घटना आहे.

अक्षयला तात्काळ निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Nimgav Jali Primary Health Center) नेण्यात आले व प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात (District Hospital) पाठवण्यात आले. डॉ. तांबोळी, वनीधिकारी श्री. पुंड, श्री. गीते यांचे सहकार्य मिळाले.

Related Stories

No stories found.