पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने खुनी हल्ला

सावेडीतील घटना || हल्ला करणारे तिघे अटकेत
पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने खुनी हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि. 13) रात्री साडे अकराच्या सुमारास सावेडी उपनगरातील पंचवटीनगरच्या शिमला कॉलनीत घडली. सचिन अशोक भांड (वय 36 रा. शिमला कॉलनी, पंचवटीनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणार्‍या तिघांवर गुरूवारी (दि. 14) खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश बापुराव म्याना (वय 35 रा. श्रमिकनगर), प्रशांत बलराज म्याना (वय 43), राजू उर्फ नितीन प्रल्हाद शिंदे (वय 38 दोघे, रा. शिमला कॉलनी, पंचवटीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी सचिन भांड व महेश म्याना यांच्यात वाद झाले होते. सचिन यांनी महेश याची माफी मागितल्यानंतर सदरचे वाद मिटले होते. बुधवारी रात्री सचिन व त्यांचे दोन मित्र पंचवटीनगरच्या शिमला कॉलनीत गप्पा मारत असताना महेश, प्रशांत व राजू तेथे आले. ते तिघे येताच सचिनचे दोन्ही मित्र तेथून निघून गेले. काही वेळातच तिघांनी सचिन यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सचिन यांच्या घरातून त्यांचे वडिल व इतर नातेवाईक पळत आल्याने हल्ला करणारे तिघे पसार झाले.

सचिन यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जे.सी.मुजावर, उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, अंमलदार दत्तात्रय जपे, अहमद इनामदार, वसीम पठाण, संदीप धामणे, अविनाश वाकचौरे, सुरज वाबळे, संदीप गिर्‍हे, गौतम सातपुते, सतीश त्रिभुवन, सतीश भवर यांनी तिघांना तात्काळ अटक केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com