गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने तरूणावर चाकू हल्ला

माऊली संकुलसमोरील घटना || दोघांवर गुन्हा
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने तरूणावर चाकू हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रस्त्यावर उभी केलेली गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने तरूणावर चाकू हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री सावेडी उपनगरातील माऊली संकुलसमोर घडली. ओंकार एकनाथ लहारे (वय 30 रा. लालटाकी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यांनी उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अभिजित वाकळे व एक अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री फिर्यादी व त्यांचा मित्र योगेश गिते माऊली संकुलकडे जात असताना रस्त्यावरील वाहतुकीमध्ये एक व्यक्ती थांबलेला होता. त्या व्यक्तीला फिर्यादी यांनी गाडी बाजुला घेण्यास सांगितले असता त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत मला ओळखले नाही का, मी अभि वाकळे पाटील आहे. फिर्यादी यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून माऊली संकुलमध्ये गेले. पाठीमागून अभि वाकळे व त्याचा मित्र आले. त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात चाकू मारून जखमी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com