
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
जातीवाचक शिवीगाळ करुन चाकू (Knife) व कुर्हाडीने (Axe) तरूणावर वार (Youth War) केल्याची घटना दिनांक 19 ऑगस्ट रोजी राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) कनगर येथे घडली आहे. या घटनेबाबत दोघां बाप लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज विनोद दिवे, राहणार कनगर ता. राहुरी या तरूणाने राहुरी पोलिसांत (Rahuri Police) दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दिनांक 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान सुरज दिवे व त्याचा भाऊ हे त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर उभे होते. त्यावेळी तेथे आरोपी (Accused) आले. आणि सुरज दिवे याचा भाऊ संकेत दिवे यास म्हणाले, मी विहिरीतील मोटर व स्टार्टर चोरी करतो. असे तू लोकांना सांगतो. असे म्हणून आरोपींनी सुरज दिवे याच्या भावावर चाकू (Knife) व कुर्हाडीने वार (Axe) करून जखमी (Injured) केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी (Threat) दिली.
सुरज विनोद दिवे याच्या फिर्यादीवरून आरोपी अनिकेत राजेंद्र घाडगे व राजेंद्र भाऊसाहेब घाडगे या दोघां बापलेकावर गुन्हा रजि. नं. 794/2022 भादंवि. कलम 324, 323, 504, 506, 34 सह अनुसूचित जाती जमाती कायदा कलम 3 (1), (आर), (एस) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.