कोपरगावच्या तरूणाचे अपहरण करून आळेफाट्यात घरात डांबले

खंडणीही मागितली, पाच आरोपी जेरबंद, दोन महिलांचा समावेश
कोपरगावच्या तरूणाचे अपहरण करून आळेफाट्यात घरात डांबले

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव बसस्थानक (Kopargav Bus Stand) येथून 15 जुलै रोजी एका तरुणाचे (Youth) कारमधून अज्ञात व्यक्तींनी अपहरण (Kidnapping) केले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले (PI Vasudev Desale) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुणे (Pune) जिल्ह्यातून पाच आरोपींना अटक (accused arrested) केली आहे. यामध्ये दोन महिलांचा (Women) समावेश असून 6 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .

प्रमिला नामक महिलेच्या सांगण्यावरून 5 लाख रुपयांच्या मागणीसाठी मनमाडच्या (Manmad) स्वामी जनार्दन नगर येथील सचिन वसंत जाधव या तरुणाचे कोपरगाव (Kopargav) शहरातील बसस्थानक येथून 15 जुलै रोजी दुपारी पांढर्‍या रंगाच्या इर्टीगा कारमधून आलेल्या अज्ञात तिघे इसम व एक अज्ञात महिला यांनी अपहरण (Kidnapping) केले होते. याबाबत अपहरण झालेल्या तरुणाची पत्नी भावना जाधव यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत होते.

शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव (Shirdi Sub-Divisional Police Officer Sanjay Satav) व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक गोष्टींच्या आधारे पुणे जिल्ह्यातील आळेफाटा (Aale Phata) येथील एका घरात डांबून ठेवलेल्या अपहरणग्रस्त तरुणाची सुटका करत एकनाथ हरिभाऊ हाडवळे रा.राजुरी , ता.जुन्नर, भाऊसाहेब विठ्ठल काळे रा. आळेफाटा , ता.जुन्नर, प्रवीण रबाजी खेमनर रा.अंभोरे , ता.संगमनेर, प्रमिला महेश पवार रा.चेहेडी, ता.जि. नाशिक व सीमा भाऊसाहेब काळे रा.आळेफाटा, ता.जुन्नर यांना ताब्यात घेऊन 6 लाख रुपयांची इर्टीगा कार ( क्र . एमएच .14 , जेए .6572 ) आणि गुन्ह्यात वापरलेले दहा हजार रुपयांचे दोन मोबाईल असा 6 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाइर्त पोलीस उपनिरीक्षक बी.सी.नागरे, पो.कॉ.जी.पी.थोरात, पी.बी.बनकर, महिला पोलीस विजया दिवे, पो.ना.फुरकान शेख, गृहरक्षक दलाचे जवान दीपक गर्जे आदींनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com