..अखेर ‘त्या’ तरूणांना सापडला दीड तोळे सोन्याचा मालक

..अखेर ‘त्या’ तरूणांना सापडला दीड तोळे सोन्याचा मालक

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

आज पण समाजामध्ये प्रामाणिकपणा (Honesty) जिवंत आहे याचे ताजे उदाहरण म्हणजे पुणतांबा (Puntamba) येथील दोन तरुण होय.

काही दिवसापूर्वी कोपरगाववरून श्रीरामपूरकडे (Kopargav-Shrirampur) एक जोडपे मोटरसायकलवरून (Motorcycle) जात असताना मोटरसायकलच्या मागील बाजूस अडकवलेल्या पिशवीतून एक पाकीट (Wallet) आशा केंद्र (Asha Center) चौफुलीजवळ पडलेले दिसले. संतोष देशमुख व रोहिदास शिंदे या तरुणानी त्यांना आवाज दिला परंतु ते पती-पत्नी (Husband and wife) पुढे निघून गेले. उघडलेले पाकीट (Wallet) बघितल्यावर त्यांना अंदाजे दिड तोळ्याचे फासे तुटलेले गंठण सापडले.

आठवडाभर दोन तरुणांनी सोनाराचा व गंठण हरवलेल्या व्यक्तींचा शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला. अखेर सदर व्यक्ती शोध घेता सापडली. त्यांना फोन करून सर्व बाबींची शहनिशा करून त्यांना पुणतांबा (Puntamba) येथे बोलवण्यात आल. सदर जोडपे कोपरगाववरून (Kopargav) नेवाशाकडे (Newasa) जात असताना पोहेगाव (Pohegav) येथील मंगेश पवार व त्यांच्या पत्नीच दीड तोळ्याचे गंठण असल्याची खात्री या दोन तरुणांनी केल्यानंतर त्या पवार कुटुंबियांना त्यांनी पुणतांबा येथे बोलावून प्रामाणिकपणे त्यांच्या पत्नीला गंठण परत केल.

सौ. पवार यांच्या चेहर्‍यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी संतोष देशमुख व रोहिदास शिंदे या दोन तरुणांची आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली. आजही समाजामध्ये प्रामाणिकपणा जिवंत आहे याचे उदाहरण पुणतांबा येथे पहावयास मिळाल. पुणतांबा परिसरात दोन्ही तरुणांचे कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com