तरुणांनी दिले बगळ्याला जीवदान

तरुणांनी दिले बगळ्याला जीवदान

राहाता |प्रतिनिधी| Rahata

लिंबाच्या झाडाला अडकलेल्या मांजामध्ये फसलेल्या एका बगळ्याला राहाता येथील पक्षीप्रेमी तरुणांनी जीवदान दिले आहे. रात्रीच्या वेळी हा बगळा झाडावरील मांजामध्ये फसला होता. जिवाच्या आकांताने विव्हळत असलेल्या बगळ्यास नगरपालिका अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी खडतर परिश्रमानंतर वाचवल्याने सर्व कर्मचार्‍यांचे उपस्थित ग्रामस्थांनी कौतूक केले.

विरभद्र महाराजांचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी अनिल कुंभकर्ण यांचे बगळयाकडे लक्ष गेले. त्यांनी लागलीच इतर काही पालिका कर्मचारी आणि तरुणांच्या मदतीने बगळ्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी योगेश सुरासे या तरुणाने मोठ्या हिमतीने झाडावर चढून नाजूक फांदीवर जात या बगळ्याची सुटका केली.

पायात अडकलेला मांजा अलगद बाजूला करून तरुणांनी बगळ्याला पाणी पाजले. राहाता येथील तरुणांनी तसेच कर्मचारी अनिल कुंभकर्ण, योगेश सुरासे, प्रमोद बनकर, कुर्‍हाडे आदींनी दाखवलेल्या पक्षी प्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com