उड्डाणपूलावरून पडून युवकाचा मृत्यू

File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उड्डाणपूलावरून (Flyover) वेगात दुचाकी घेऊन जाणारा युवकाचा स्टेट बँक चौक (State Bank Chowk) ते चांदणी चौकादरम्यान (Chandani Chowk) वळणावर अपघात (Accident) होवून तो उड्डाणपूलावरून (Flyover) खाली कोसळला. उड्डाणपूलावरून खाली कोसळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे. संकेत राजेंद्र डोळे (वय 21 रा. शहरटाकळी ता. शेवगाव) असे मयत युवकाचे नाव आहे.

File Photo
डोक्यात खोरे घालून केला भावाचा खून

मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संकेत हा त्याच्याकडील दुचाकीने एकटाच उड्डाणपूलावरून (Flyover) प्रवास करत होता. स्टेट बँक चौक ते चांदणी चौकादरम्यान असलेल्या वळणावर अंदाज न आल्याने त्याची दुचाकी घसरून तो खाली पडला. दुचाकी उड्डाणपूलावरच होती.

File Photo
आ. तनपुरे, आ. जगताप यांच्या नावाचे बनावट शिक्के, लेटर पॅड

गंभीर जखमी (Injured) झालेल्या संकेतला शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवळच असलेल्या एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान तेथील डॉक्टारांनी त्याला मृत घोषित केले. दुपारनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी येथील जिल्हा शायकीस रूग्णालयात आणण्यात आला होता.

File Photo
तोफखाना पोलिसांच्या आशिर्वादाने आयपीएल बुकी गब्बर
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com