प्रवरा नदीपात्रात बुडून तरूणाचा मृत्यू

प्रवरा नदीपात्रात बुडून तरूणाचा मृत्यू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) मालुंजा खुर्द (Malunja Khurd) येथे अंघोळ करण्यासाठी प्रवरा नदी (Pravara River) पात्रात उतरलेले कैलास चौधरी हे नदीपात्रातील पाण्यात बुडून (River Drowning) मयत झाल्याची घटना दि. 1 एप्रिल रोजी घडली.

कैलास नानासाहेब चौधरी वय 41 वर्षे, रा. दरडगाव तर्फे, बेलापूर ता. राहुरी हे दि. 1 एप्रिल रोजी त्यांचे काम आवरल्यानंतर दुपारी चार वाजे दरम्यान मालुंजा खुर्द (Malunja Khurd) येथील प्रवरा नदीपात्रात (Pravara River) अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यांना पोहता येत नव्हते. नदीपात्रात उतरल्यावर त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. ते तसेच पाण्यात बुडाले.

यावेळी त्या परिसरात असलेल्या काही महिलांनी त्यांना बुडताना पाहिले. त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी परिसरातील काही तरूणांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. कैलास चौधरी यांचा पाण्यात शोध घेऊन त्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने राहुरी (Rahuri) येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयातील (Rahuri Rural Hospital) वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून राहुरी पोलिसात (Rahuri Police) अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास हवालदार अशोक शिंदे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.