तरुणाची फसवणूक करत विवाहितेचा पोबारा

केडगावातील प्रकार : दागिने, रोख रक्कमेसह सहा लाखांचा ऐवज लंपास
तरुणाची फसवणूक करत विवाहितेचा पोबारा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुलीविषयी खोटी माहिती सांगून तरुणासोबत लग्न करून दिले. तसेच तरुणाने लग्नात केलेले दागिने आणि रोख रक्कम असा पाच लाख 82 हजार 979 रुपयांचा ऐवज घेऊन विवाहिता व तिची आई निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणाने येथील कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. महेश प्रभाकर भांबरकर (वय 24 रा. भुषणनगर, केडगाव) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पत्नी आश्विनी महेश भांबरकर, सासू सुजाता राजु जाधव, सासरा राजू जाधव, मेव्हणा आकाश राजू जाधव (सर्व रा. वडगाव आमली ता. पारनेर) व लग्न जमवणारा मध्यस्थी राजेंद्र पाोखरणा (रा. भाळवणी ता. पारनेर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

22 मे, 2022 रोजी फिर्यादी महेश यांचे आश्विनीसोबत लग्न झाले होते. त्याासाठी राजेंद्र पोखरणा याने मध्यस्थी केली होती. याबाबत दिलेल्या फिर्यादीत महेशने म्हटले आहे की,‘पत्नी अश्विनी हिच्याविषयी लग्न जमवणारे पोखरणा, सासू सुजाता, सासरे राजु, मेव्हणा आकाश यांनी खरी माहिती सांगितली नाही. माझ्या आई वडीलांच्या इस्टेटवर नजर ठेवून माझ्या सोबत अश्विनीचा विवाह लावून दिला. 22 मे 2022 ते 15 जुलै, 2022 या कालावधीत आश्विनीने मला वेळोवेळी विश्वासात घेतले.

तीची आई सुजातास 16 जुलै, 2022 रोजी केडगाव येथील माझे रहाते घरी मी घरात नसताना बोलावून घेतले. त्यांनी दोघींनी सासरे राजू, मेव्हणा आकाश व मध्यस्थी पोखरणा यांचे सांगणेवरून माझा विश्वासघात करून माझे घरातील रोख रक्कम व माझे वडीलांनी लग्नाचे वेळी केलेले सोन्या-चांदीचे दागिणे व घरातील कपडे असा एकूण पाच लाख 82 हजार 979 रुपये किंमतीचा ऐवज घेऊन पोबारा केला. त्या सर्वांनी संगनमताने माझी व माझे कुटुंबाची फसवणूक करून मला मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com