मुळा पात्रात युवकाचा मृतदेह
सार्वमत

मुळा पात्रात युवकाचा मृतदेह

Sarvmat Digital

राहुरी – तालुक्यातील आरडगाव येथील सुरेश लक्ष्मण जाधव (वय ३५) यांचे प्रेत मुळा नदी पात्रात आढल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान आरडगाव येथील सुरेश जाधव हे गुरूवार दि. २३ जानेवारी पासून बेपत्ता होते. आज रविवारी दि. २६ जानेवारी रोजी नदी पात्रात मासेमारी करणाऱ्यांना दुपारच्या सुमारास आढळून आले. त्यांनी तात्काळ आरडगाव चे पोलिस पाटील लक्ष्मण जाधव यांना कळविले.

मात्र सदर घटना शिलेगाव हद्दीत असल्याने त्यांनी शिलेगावच्या पोलिस पाटील यांना कळविले. शिलेगावचे पोलिस पाटील सदशिव तागड यांनी राहुरी पोलिस ठाण्यात या घटनेची खबर दिली असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

नंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी राहुरीच्या ग्रामिण रूग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात आ.मृ ची नोंद झाली असून पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com