तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

खैरी निमगांव |वार्ताहर| Khairi Nimgav

श्रीरामपूर तालुक्यातील निमगावखैरी येथील सोमनाथ बापू उंदरे (वय 32) हा तरुण त्यांच्याच शेतातील विहिरीत मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निमगाव खैरी येथील तीनचारी परीसरातील इंद्रायणी भागवत उंदरे यांच्या मालकीची गट नं. 85 मधील विहीर पूर्णपणे भरलेली असल्याने मयत सोमनाथ हा दुपारच्यावेळी पाणी पिण्यासाठी गेला असताना पाय घसरून विहिरीत पडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रात्री घरी न आल्याने घरातील मंडळींनी त्याचा इतरत्र शोध घेतला मात्र मिळून न आल्याने रात्री तालुका पोलीस ठाण्यात मिसींगचा तक्रार अर्ज देण्यात आला.

दरम्यान पुन्हा शोध सुरू असताना रात्री शेतात रस्त्याच्या कडेला त्याची गाडी लावलेली दिसली तर विहिरीत सोमनाथच्या चपला दिसल्याने गळ टाकून विहिरीत शोध घेतला असता तो विहिरीत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी साखर कामगार रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सोमनाथ उंदरे यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परीवार असून आई-वडील वयोवृद्ध आहेत. सोमनाथ घरातील कर्ता पुरुष होता.

याप्रकरणी मयत सोमनाथचा भाऊ विनायक बापू उंदरे यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com