अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाजपचे केंद्रीय मंत्री खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

आज सकाळी 11 वाजता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मंत्री खा. दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी केलेल्या वक्तव्याचा जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ते पत्रकांरशी बोलत होते. तांबे म्हणाले, केंद्रीय मंत्री दानवे यांनी अनेक वेळा शेतकर्यांबद्दल अपशब्द वापरले आहेत. आताही शेतकर्यांच्या आंदोलनाला भरडकवण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तान, चायनासारखे मुद्दे काढून शेतकर्यांच्या आंदोलनावर शेतकर्यांच्या आंदोलनावर शेतकर्यांचे मुद्दे सोडून बोलण्याचे प्रयत्न करत आहे.

दानवे यांनी शेतकर्यांविषयी असलेली भावना त्यांनी सातत्याने बोलून दाखवली आहे. दिल्लीत तीन आठवड्यांपासून शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. पंजाब, हरियाणा आजूबाजूचे शेतकरी शेतकर्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहे. सध्या कडाक्याच्या थंडीमध्येही शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी बोलण्यासाठी भाजप नेत्यांना व भाजप सरकारला वेळ नाही, असा आरोप तांबे यांनी केला.

शिर्डी संस्थांनी लावलेल्या फलकावरून सुरू असलेल्या वादावर तांबे यांना विचारले असता ते म्हणाले, शिर्डीचे नगराध्यक्ष यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांचा मुद्दा अतिशय रास्त आहे. मंदिरात जे कपडे भाविक घालून येतात ते कपडे व्यवस्थित असले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, यासाठी त्यांनी कोणतेही बंधन घातले नाही. अंगप्रदर्शन होणारे कपडे नसावे, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी होणार नाहीत, असे मत तांबे यांनी व्यक्त केले. अमुक कपडे घाला असे बंधन नाही, पण कपडे व्यवस्थित असावेत, अशी ग्रामस्थांची भावना असून मला वाटते त्यांची मागणी रास्त आहे.