तहसील कार्यालयाच्या गेटसमोरच तरुणाची आत्महत्या

तहसील कार्यालयाच्या गेटसमोरच तरुणाची आत्महत्या

शेवगाव l शहर प्रतिनिधी

शेवगाव तहसील कार्यालयाच्या लोखंडी गेटसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेवून तरुणाने जीवन यात्रा संपविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस असल्याने शहरासह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

भाऊसाहेब सर्जेराव घनवट (वय २९) रा. नजीक बाभूळगाव ता.शेवगाव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने ही घटना नेमकी कशातून झाली. याबाबत तर्क वितर्क लढविण्यात येत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मंगळवारी ३० नोव्हेबर रोजी तहसील कार्यालयाच्या मुख्य लोखंडी गेट लगत असलेल्या लिंबाच्या झाडाला एका तरुणाचा मृतदेह लटकत असल्याचे या रस्त्याने जाणा-या काहींच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती समजताच शेवगाव पोलीस ठाण्यातील अण्णा पवार व त्यांच्या पोलीस सहकार्याने घटनास्थळी धाव घेवून लिंबाच्या झाडावरून तरुणाचा मृतदेह खाली उतरून घेतला.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव भाऊसाहेब घनवट असल्याची व तो तालुक्यातील नजीक बाभूळगावचा रहिवाशी असून तो कापसाचा व्यापार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृत तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली असून मृत तरुणाच्या नातेवाईकाकडे चौकशी केल्यानंतर याबाबत मृत्यूचे कारण समजू शकेल. असे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com