
शिर्डी | प्रतिनिधी
एका बंद अवस्थेत व आरटीओ कारवाईत उभ्या गंजलेल्या अवस्थेत असलेल्या एका खाजगी बसमध्ये तरुणाने गळफास घेवून संपवल्याची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डी शहरात घडली आहे.
शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात हा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खाजगी ट्रॅव्हल बसमध्ये एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील तोसिफ इनामदार (वय ३४) असे मयताचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. सदर इसमाने स्वतः गळफास घेतला की इतर कोणी त्याला गळफास दिला याबाबत पोलिस शोध घेत आहे.