किरकोळ कारणातून तरूणावर चॉपरने हल्ला

तिघांविरूध्द पोलीस ठाण्यात फिर्याद
किरकोळ कारणातून तरूणावर चॉपरने हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तरूणावर चॉपरच्या सहाय्याने हल्ला करून जखमी करण्यात आले. समीर सरोवर शेख (वय 30 रा. रामवाडी) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून त्याने उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून युसुफ आयुब शेख ऊर्फ वटाणा (रा. मुकुंदनगर) व दोन अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील जुन्या आरटीओ कार्यालयासमोर बुधवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. समीर शेख हा गज फिटिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. समीरला बुधवारी काम नसल्याने दुपारी दोन वाजता मित्र आदिल रशीद शेख आणि जाकीर मोहम्मदअली तांबोळी यांच्यासह जुन्या आरटीओ कार्यालयासमोर गप्पा मारत थांबलेले होते. त्यावेळेस युसूफ आयुब शेख उर्फ वटाणा हा दोन मित्रांसमवेत त्या ठिकाणी आला.

मोर्चातील लोकांना शिवीगाळ करून दारू पिऊन आल्याचे तो सांगत होता. त्यांना घरी जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्याने चॉपरने हल्ला केला. त्यावेळेस इतर मित्रांनी मदत करून या हल्ल्यातून सोडविले. समीरवर जिल्हा शासकीय रूग्णालयाच उपचार सुरू आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com