युवकाला मारहाण करत तलवारीने वार करण्याचा प्रयत्न

केडगावची घटना; दोघांविरुध्द गुन्हा
युवकाला मारहाण करत तलवारीने वार करण्याचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

युवकाला दुचाकी आडवी लावून काही एक कारण नसताना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. साईश सुरेश भागवत (वय 20 रा. भुषणनगर, केडगाव) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषिकेश रमेश परदेशी व संग्राम रमेश गिते (दोघे रा. रभाजीनगर, केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी खासगी नोकरी करतात, शनिवारी सुट्टी असल्याने ते घरीच होते. चार वाजता ते राधेश्याम कॉम्पलेक्सकडे फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना परदेशी व गिते यांनी दुचाकी आडवी लावून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तलवारीने उजव्या हातावर वार करण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीने ती हुकवली. संग्राम शिंदेने फिर्यादीला हातातील स्टीलच्या कड्याने मारहाण केली. फिर्यादीचा फोटो असलेला बॅनर तलवारीने फाडून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com