निर्जनस्थळी घेऊन जात तरूणाला मारहाण करत लुटले

तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा: दोघांना अटक
निर्जनस्थळी घेऊन जात तरूणाला मारहाण करत लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

फ्लॅट भाड्याचे थकलेले पैसे देतो असे म्हणून दोघांनी एका तरूणाला निर्जनस्थळी घेवून जात मारहाण करत लुटले. या लुटीत चांदीचे ब्रेसलेट, सोन्याची अंगठी, मोबाईल, रोख रक्कम असा 40 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.

नहुश सुनील पडतुरे (वय 31 रा. गायकवाड मळा, सावेडी) असे लुट झालेल्या तरूणाचे नावे आहे. त्याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश विजयसिंग चौर, महेश गोविंद मिसाळ (रा. डावरे गल्ली, नगर) यांच्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, नहुश पडतुरे व मधुकर भुतकर हे सावेडीतील गुरूदत्त लॉन येथे गप्पा मारत असताना नहुशला आरोपीने फोन केला व म्हणाले, तुमच्या फ्लॅटचे थकलेले 15 हजार रूपये भाडे देतो, असे म्हणत परिचय हॉटेलजवळ बोलून घेतले. तेथून नहुशला आरोपीने एसबीआय चौकात नेले व पुढे बुर्हाणनगर शिवारातील स्मशानभूमी जवळ नेले.

त्याठिकाणी आरोपींनी नहुशला लाथाबुक्कांनी व दगडाने मारहाण करत मोबाईल, रोख रक्कम व सोन्या- चांदीच्या वस्तू काढून घेतल्या. या मारहाणीत नहुशच्या डोक्याला मार लागला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com