दुचाकीला कट बसल्याच्या कारणातून युवकाला मारहाण

नवनागापूरातील घटना; दोघांविरूध्द गुन्हा
दुचाकीला कट बसल्याच्या कारणातून युवकाला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीला कट बसल्याच्या कारणातून युवकाला लाकडी फळीने मारहाण करण्यात आली. नवनागापूर शिवारातील वडगाव गुप्ता ते गजानन कॉलनी जाणार्‍या रस्त्यावर अण्णाचा ढाब्याजवळ शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे.

प्रसाद संजय भवर(वय 23, रा. वनराई हॉटेल जवळ, वडगाव गुप्ता, ता. नगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्यांनी शनिवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश जाधव, सुरेश जाधव (दोघे रा. वडगाव गुप्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रसाद भवर हे शुक्रवारी दुपारी तीन वाजता वडगाव गुप्ता ते गजानन कॉलनी जाणार्‍या रस्त्यावर अण्णाचा ढाब्याजवळ जात होते.

त्यांच्या दुचाकीचा कट बसल्याच्या कारणावरून गणेश जाधव, सुरेश जाधव यांनी त्यांच्या जवळील लाकडी पट्टीने भवर यांच्या तोंडावर डाव्या कानावर मारहाण करून जखमी केले. लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार खैरे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com