मित्राच्या मदतीला गेलेल्या युवकाला मारहाण

10 जणांविरूध्द गुन्हा
मित्राच्या मदतीला गेलेल्या युवकाला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

मित्राचा अपघात झाल्यानंतर त्याच्या मदतीला गेलेल्या युवकाला फायटरसह चाकुने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी (Threat) दिल्याची घटना नालेगाव (Nalegav) परिसरात घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश संतोष भुजबळ हे मारहाणीत (Beating) जखमी (Injured) झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान भुजबळ याने दिलेल्या जबाबानुसार पुष्पक उर्फ मोन्या सुनील भोसले, सचिन बाबासाहेब चांदणे, शिव आण्णा सोनवणे, रोहित सोनवणे, महेश काळोखे आणि अनोळखी 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी भुजबळ यांना त्याच्या मित्राने नालेगाव परिसरात अपघात झाल्याने मदतीसाठी बोलाविले होते. भुजबळ त्याठिकाणी गेले असता नऊ ते 10 जणांनी त्याठिकाणी येत भुजबळ यांना फायटरने तोंडावर मारून जखमी करत चाकुने दंडावरती वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची व हात-पाय तोडण्याची धमकी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com