उचलीच्या पैशावरून डिग्रसच्या तरूणाला मारहाण

उचलीच्या पैशावरून डिग्रसच्या तरूणाला मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

उचल दिलेले पैसे परत घेण्याच्या कारणावरून प्रविण मधे या तरूणाला रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना दि. 28 ऑगस्ट रोजी नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

प्रविण धोंडीराम मधे, वय 30 वर्षे, रा. डिग्रस, ता. राहुरी या तरूणाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान प्रविण मधे व या घटनेतील साक्षीदार हे रस्त्याने जात होते. तेव्हा राहुरी येथील नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या हॉटेलसमोर आरोपी हे संगनमत करून आले. त्यांनी प्रविण मधे यांची गाडी अडवली. उचलीचे पैसे दे, असे म्हणून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

मधे याच्या फिर्यादीवरून आरोपी सतीश नाथू हंडाळ, रामा नाथू हंडाळ, चिमा नाथू हंडाळ, तिघे रा. वावरथ, ता. राहुरी तसेच सुनील नानाभाऊ रूपनर, राहणार रूपनरवाडी, ता. पाथर्डी या चारजणांवर गुन्हा रजि. नं. 830/2022 भादंवि. कलम 341, 323, 504, 506, 34 प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिवाजी खरात हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com