दांडके, पाईप, दगडाने तरूणाला मारहाण

देहरे येथील घटना || चौघांविरूद्ध गुन्हा
दांडके, पाईप, दगडाने तरूणाला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चौघांनी तरूणाला लाकडी दांडके, लोखंडी पाईप व दगडाने मारहाण करून जखमी केले. सुभाष बाळासाहेब वाघ (वय 40 रा. देहरे ता. नगर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. ही घटना 8 जानेवारी रोजी रात्री देहरे शिवारात घडली. जखमी वाघ यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाघ यांनी उपचारादरम्यान एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून 10 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. सोपान दगडू कटारे, बाळासाहेब दगडू कटारे, तुषार बाळासाहेब कटारे, मंगल बाळासाहेब कटारे (सर्व रा. देहरे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 8 जानेवारी रोजी रात्री फिर्यादी सुभाष वाघ हे त्यांच्या घरी असताना तेथे सोपान, बाळासाहेब, तुषार व मंगल हे चौघे गेले.

सोपानने वाघ यांना लाकडी दांडक्याने, बाळासाहेबने लोखंडी पाईपने, तुषारने दगडाने तर मंगल कटारे हिने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘तु आमच्या वाट्याला गेला तर तुला जिवंत सोडणार नाही,’ असा दम दिला. घरातील सामान अस्तव्यस्त करून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार राहुल शिंदे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com