कट मारल्याच्या रागातून तरूणाला गजाने मारहाण

कट मारल्याच्या रागातून तरूणाला गजाने मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीवरून (Two-wheeler) जात असताना कट का मारला, असे विचारत तरूणाला पाईप आणि गजाने मारहाण (Young man beaten with pipe) केल्याची घटना शहरात घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात (Topkhana Police Station) सहा जणांविरोधात गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.

करण खंडू पाचरणे (वय 28, रा. पितळे कॉलनी, एमआयडीसी) असे मारहाण (Beating) झालेल्या तरूणाचे नाव त्याने फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये अमोल पाडळे, ऋषी साळवे, अक्षय पवार, विकी साळवे, प्रतिक साळवे, महेंद्र तांबे (सर्व रा. निलक्रांती चौक, अहमदनगर) यांचा समावेश आहे. रविवार 1 मे रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान फिर्यादी पाचरणे त्याच्या मित्रांसह दिल्लीगेट (Delhi Gate) परिसरातून दुचाकीवरून जात होता.

त्यावेळी त्यांना आरोपींनी अडवून तुम्ही आम्हाला कट का मारला होता, असे विचारत शिवीगाळ करत शॉकअपच्या पाईपने आणि लोखंडी गजाने मारहाण (Beating) केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.