दोघा युवकांना मारहाणप्रकरणी कारवाई करा

सोनई परिसरातील युवकांनी काढला पोलीस ठाण्यावर मोर्चा
दोघा युवकांना मारहाणप्रकरणी कारवाई करा

सोनई |वार्ताहर| Sonai

दोन युवकास बेदम मारहाण करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोनई परीसरातील युवकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध केला.

‘पोलिसांच्या दादागिरीचा निषेध असो’ अशा घोषणा देत युवकांनी पोलीस ठाणे आवाराला घेराव घातला. सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, पीएसआय उमेश पतंगे, कर्मचारी संजय चव्हाण व अन्य एका पोलिसाने कुठलीही तक्रार अथवा फिर्याद नसताना राजेंद्र मोहिते (गणेशवाडी) व तुषार व्यवहारे (सोनई) या दोघास बेदम मारहाण केली. हात, पाठ व कानाला गंभीर जखमा व मुका मार लागला आहे असे जाहीर भाषणात सांगण्यात आले.

रेणुका व्यवहारे, द्वारका कुमावत, मानवाधिकारचे कार्यकर्ते प्रसाद घोगरे यांनी पोलिसांच्या भुमिकेवर रोष व्यक्त करीत कारवाईची मागणी केली. शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी जखमी युवकाचा जबाब, रुग्णालयाचा अहवाल पाहून निरपेक्ष चौकशी करुन दोषी पोलिसांवर कारवाई केली जाईल असा शब्द दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Related Stories

No stories found.