
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बोल्हेगाव येथे पती- पत्नीने महिलेला मारहाण केल्याची घटना (दि. 25) रात्री 10 वाजता घडली. या प्रकरणी रुथ नरेंद्र मिसाळ (वय 28, रा. अर्जूननगर कॉलनी, बोल्हेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुनम ईश्वर सरोदे व ईश्वर सरोदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी घराच्या अंगणात मुलांना खेळवत असताना अंगणात लावलेल्या झाडाला साडी बांधलेली होती. ती साडी पूनम सरोदे सोडत असताना तू का साडी सोडते, असे म्हणल्याने पुनम सरोदे हीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तिच्या हातातील तांब्या फिर्यादीला मारत असताना तो तांब्या फिर्यादीच्या मुलीच्या पायाला लागला.
पुनम हीचे पती ईश्वर सरोदे यांनी शिवीगाळ करून फिर्यादीला दगड मारला. पुनम सरोदे हिने फिर्यादीचे केस पकडून लाथाबुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.