
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
घरातील भांडे चोरल्याच्या संशयावरून राहुरी स्टेशन (Rahuri Police Station) येथील एका तरूणाच्या (Youth) डोक्यात कुर्हाडीने वार (Axe Attack) करून त्याला जिवे ठार (Death) मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या तरूणाची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे ही घटना घडली असून दोघांवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
लिलाबाई शामराव गायकवाड (वय 65), या त्यांचा मुलगा शंकर गायकवाड याच्यासह राहुरी तालुक्यातील राहुरी स्टेशन, गावठाण, येथे राहतात. त्यांचा दिर सावळेराम दगडू गायकवाड हा त्यांच्या शेजारीच राहतो. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजे दरम्यान लिलाबाई गायकवाड, त्यांचा मुलगा व सून हे त्यांच्या घरी असताना त्यांचा पुतण्या आरोपी गोरख सावळेराम गायकवाड हा घरासमोर शिवीगाळ करत आला. आणि शंकर गायकवाड याला म्हणाला कि, तु आमचे घरातील भांडे चोरले आहे. असे म्हणुन गोरखने शंकर गायकवाड याला मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली.
तेव्हा लिलाबाई गायकवाड यांचा दिर आरोपी सावळेराम दगडु गायकवाड हा त्याच्या हातात कुर्हाड (Axe) घेवुन आला. घरातील भांडे तुच चोरले आहे असे म्हणुन त्याने शंकर गायकवाड याच्या डोक्यात कुर्हाडीने वार (Axe Attack) केला. तसेच लिलाबाई गायकवाड यांना लाथाबुक्यांनी मारहाण (Beating) केली. तसेच आमच्या नादी लागला तर तुमचा काटाच काढीन, अशी जिवे मारण्याची धमकी (Threat) दिली. या घटनेत शंकर गायकवाड हा गंभीर जखमी झालाय.
त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लिलाबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी सावळेराम दगडू गायकवाड व गोरख सावळेराम गायकवाड या दोघा बाप लेकावर गुन्हा रजि. नं. 230/2023 भादंवि कलम 307, 323, 504, 506, 34 प्रमाणे जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलिस (Rahuri Police) करीत आहे.