तिघांकडून तरूणावर जीवघेणा हल्ला

कुठे घडली घटना?
तिघांकडून तरूणावर जीवघेणा हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव उपनगरात रविवारी दुपारी दोन कुटुंबात किरकोळ कारणातूून वाद झाले. या वादात तरूणाला लोखंडी धारदार मोठी कात्री, लोखंडी हुक व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत विष्णू साळवे (वय 34 रा. पाच गोडाऊनजवळ, केडगाव) असे जखमी तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी मनिषा चंद्रकांत साळवे (वय 26 रा. पाच गोडाऊनजवळ, केडगाव) यांनी रविवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिघांकडून तरूणावर जीवघेणा हल्ला
कुलगुरूंनी अनधिकृत विद्यार्थ्यांना दिली कारवाईची तंबी

सुनील शिरसाठ, गर्व सुनील शिरसाठ, प्रियंका सुनील शिरसाठ (सर्व रा. पाच गोडाऊनजवळ, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मनिषा साळवे व त्यांचे पती चंद्रकांत साळवे हे शिरसाठ यांच्या घरासमोरून पायी जात असताना शिरसाठ यांचे कुत्रे मनिषा यांना भुकले. तेव्हा चंद्रकांत मनिषाला म्हणाले,‘तु भिवू नकोस कुत्रे काही करत नाही’, त्यावर सुनीलने मनिषा यांना शिवीगाळ करून लोखंडी धारदार कात्री, हुकने व लाकडी दांडक्याने चंद्रकांत यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने थांब तुला मारूनच टाकतो, असे म्हणून मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.

तिघांकडून तरूणावर जीवघेणा हल्ला
राहुरी शहरात दोन दिवसांपासून हाणामार्‍या
तिघांकडून तरूणावर जीवघेणा हल्ला
राहाता बाजार समितीत लूज कांद्याला मिळतोय हा भाव
तिघांकडून तरूणावर जीवघेणा हल्ला
पाणबुडी मोटार चोरणारे दोघे अटकेत
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com