लालटाकी येथे युवकावर कोयत्याने हल्ला

तोफखाना पोलिसांत दोघांविरूध्द गुन्हा
लालटाकी येथे युवकावर कोयत्याने हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोघा भावांनी युवकाला मारहाण करत कोयत्याने कपाळावर मारून जखमी केले. राहुल डॅनियल मोहिते (वय 21 रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी) असे जखमी युवकाचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी जखमी राहुल मोहिते याच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्यम सनी शिरसाठ व आदेश सनी शिरसाठ (दोघे रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास राहुल मोहिते घरी असताना सत्यम व आदेश त्याच्या घरी आले. त्यांनी राहुलला घरातून बाहेर बोलविले व लालटाकी कमानीजवळ येण्याचे सांगितले. राहुलने नकार देताच दोघांनी त्याला शिवीगाळ केले. सत्यमने त्याच्या हातातील कोयता राहुलच्या कपाळावर मारून जखमी केले.

राहुलचा भाऊ बंटी भांडण सोडविण्यासाठी मध्ये आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली, ‘तू जर आमच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुला जिवेच मारून टाकीन’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपसा तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com